श्री. सुनिल रुपचंद धनगर. (D. Agri. M.A. Eng)

धरेची ओढ मला, माझ्या नभाचे गूढ मला, घालावा आवर कसा, वेगळाच सूर माझा,
वेगळे वागणे माझे, वेगळे सांगणे माझे, थेट जीवातला सूर, ओठावर येई माझ्या....!!

आयुष्यात जे वेगळ्या वाटेने प्रवास करतात तेच ख-या अर्थाने यशो शिखर गाठतात. हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन मी ४ वर्षापूर्वी पुण्यात दाखल झालो आणि मग सर्व कामे एकत्रित करण्यासाठी 'Data F'line Solution' या फर्मची स्थापना केली.

स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, वक्तृत्व कौशल्य प्रशिक्षण, विविध कार्यक्रमांचे निवेदन, विविध विषयांवरील व्याख्याने असा एकंदरीत व्याप एकाच छत्राखाली समर्थपणे गेल्या ४ वर्षापासून पेलातोय. कारण युवाच्या उलट केला तर वायू होत, या वायूच्या वेगाच्या प्रचंड शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी कसा करून घेता येतो हे दाखविण्याचा माझा निरंतर प्रयत्न आहे.

आमचं ब्रीद वाक्य आहे “Aspire to inspire………. Before you expire”.