युवा व्याख्याते

Data F' Line चे संचालक यांनी आतापर्यंत ४०० हून अधिक ठिकाणी व्याख्याने महाराष्ट्रात दिली आहेत. स्पर्धा परीक्षा व "व्यक्तीमत्वाचा विकास", "आजचा युवक दशा आणि दिशा", आभ्यास म्हणजे नेमक काय? १० वी १२ वी नंतर करिअरच्या वाटा, अशा विविध विषयांवर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस अशा विविध ठिकाणी व्याख्याने देऊन हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाचे सलग तीन वर्ष वक्तृत्व आणि वादविवाद कलाप्रकारात "सुवर्णपदक" प्राप्त आहे.

निवेदक

विविध प्रकारच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमांसाठी निवेदन केले जाते. जळगाव आकाशवाणीच्या “युवावाणी” विभागाचा निवेदनाचा अनुभव आहे. ३०० हुन अधिक कार्यक्रमांना यशस्वीपणे निवेदन केलेले आहे.

वक्तृत्व कौशल्य प्रशिक्षण

आज एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठी शक्ती कोणती असेल तर ती म्हणजे तुमचे शब्दसामर्थ्य, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला उत्तम कामगिरी करायची असेल तर तुमचे संभाषण कौशल्य उत्तम असण गरजेचे आहे. सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची गरज पडते व तुमच्या व्यक्तीमत्व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सभेत कसे बोलावे याचं विशेष प्रशिक्षण दिले जाते. वक्तृत्व, वादविवाद स्पर्धाची शालेय स्तरापासुन तयारी किंवा महाविद्यालयीन काळात कसा अभ्यास करायचा याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. संचालकांना ४५० हुन अधिक वक्तृत्व, वादविवाद स्पर्धां मधून प्रथम क्रमांकाची पारितोषिके प्राप्त आहेत.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

आज सर्वत्र जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आहे. आजकाल जो तो स्थिरता शोधायचा प्रयत्न करतो आहे. स्पर्धा परीक्षा हा असा एकमेव मार्ग आहे. जो तुम्हाला त्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. MPSC, UPSC, Banking, D.Ed  CET,  B.Ed CET, SET / NET, पो. भरती. अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. सोबतच मुलाखत प्रशिक्षण दिले जाते.

करिअर समुपदेशक

आज आपल्यासमोर नव्या युगाचं दालनच उघडलंय यातील नेमकी आपली वाट कोणती हे समजण अतिशय गरजेचं आहे. आपली आवड काय? आपला कल कुठल्या बाजूला आहे, आपल्या क्षमता कुठल्या, आपल्या उणीवा काय? नेमके तेच करीयर आपण का निवडतोय? अशा अनेक बाबतीत विद्यार्थी व पालक यांचे समुपदेशन केले जाते. कारण वाटेनुसार पाऊल सेट करण्यापेक्षा, पावलानुसार वाट सेट केली तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही.

डाटा एन्ट्री

आज धावपळीच्या युगात प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. त्यासाठी आपण घरबसल्या विद्यार्थी, गृहिणी, निवृत व्यक्ती अशा सर्वांसाठी फॉर्म फीलिंग, हँण्डरायटिंग, टायपिंग अशी सर्व ऑफलाईन कामे पुरवतो. थोड्याशा गुंतवणुकीत आपण घरी बसून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी प्राप्त करून देतो.